Infliximab वापरते
Infliximab ला संधिवात, ऍन्कायलोसिंग स्पॉंडायलिटिस, सोरायसिस (चांदीसारखी खवले असलेली त्वचेवरची रॅश), आतड्याच्या सुजेने होणारा अल्सर आणि क्रोन रोगच्या उपचारात वापरले जाते.
Infliximab चे सामान्य दुष्प्रभाव
अन्न खावेसे न वाटणे, डोकेदुखी, वेदना, सायनस दाह, वरील श्वसनमार्गात संसर्ग, ड्रग इन्फ्युजन रिअँक्शन, पोटात दुखणे, विषाणू संसर्ग
Want to Know More
Read Our Editorial PolicyInfliximab साठी उपलब्ध औषध
Infliximab साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला पुढील स्थिती असेल तर इनफ्लिक्सीमॅब सुरु करु नकाः संक्रमण, त्वचा असामान्य उकलणे (फिस्टुली), कोणताही गंभीर हृदय, फुफ्फुस किंवा चेतासंस्थेचा रोग, पूर्वीचा क्षयरोग किंवा बुरशीजन्य संक्रमण, कर्करोग, अति धूम्रपान, अलिकडील लसीकरण किंवा कर्करोगाच्या उपचारासाठी BCG टोचून घेणे, पूर्वी इनफ्लिक्सीमॅब घेतली असेल तर.
- तुम्हाला संक्रमाणाची चिन्हे दिसल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या जसे ताप, खोकला, फ्लूची लक्षणे, गरम किंवा लाल त्वचा, जखमा किंवा दातांच्या समस्या, बरे न वाटणे, अलर्जिक प्रतिक्रिया, हृदय, यकृत, फुफ्फुस किंवा चेता संस्थेची समस्या, रोग प्रतिकार यंत्रणेचा ल्युपस विकार, रक्तातील घटकांची कमी संख्या.
- इनफ्लिक्सीमॅब घेण्यापूर्वी तुमच्या मुलाचे सर्व लसीकरण झाले असल्याची खात्री करा.
- इनफ्लिक्सीमॅब उपचारा घेताना प्रभावी गर्भनिरोधक उपाय वापरा.
- इनफ्लिक्सीमॅब घेतल्यानंतर तुम्हाला भोवळ आली तर गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.



